पुणे : धनकवडीत मोटारी जाळण्याचा प्रयत्न

सचिन कोळी
बुधवार, 31 जानेवारी 2018

चैतन्यनगर येथे सुप्रसिध्द साहित्यिकांनी वसवलेले कलानगर आहे. रस्त्याच्या पुर्वेला साहित्यिकांचे बंगले तर पश्चिमेला रहिवाशी इमारती आहेत. या इमारतींना वाहने पार्किंगला जागा नसल्यामुळे वाहने पुर्वबाजूला बंगल्यांसमोर उभी केली जातात. रविवारी मध्यरात्री सरस्वती अपार्टमेंटमध्ये राहणारे इंगळे यांच्या मोटारीला आग लागल्याने परिसरात धूर झाला.

पुणे : धनकवडी येथील चैतन्यनगर परिसरात मंगळवारी मध्यरात्री रस्त्यालगत पार्किंग केलेल्या मोटारी जाळण्याचा प्रयत्न नागरिकांच्या प्रसंगावधाने टळला. रविवारी मध्यरात्री एक मोटार आणि मंगळवारी मध्यरात्री त्याच ठिकाणी उभा असलेली दुसरी मोटार जाळण्याचा झालेला प्रयत्न नागरीकांनी हाणून पाडला असला तरी दोन्ही मोटारींचे टायर जळून वाहनांचे नुकसान झाले आहे.

चैतन्यनगर येथे सुप्रसिध्द साहित्यिकांनी वसवलेले कलानगर आहे. रस्त्याच्या पुर्वेला साहित्यिकांचे बंगले तर पश्चिमेला रहिवाशी इमारती आहेत. या इमारतींना वाहने पार्किंगला जागा नसल्यामुळे वाहने पुर्वबाजूला बंगल्यांसमोर उभी केली जातात. रविवारी मध्यरात्री सरस्वती अपार्टमेंटमध्ये राहणारे इंगळे यांच्या मोटारीला आग लागल्याने परिसरात धूर झाला. नागरिक जागे झाले आणि पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळविले. पाठोपाठ मंगळवारी रात्रीही मोटारी जाळण्याचा प्रयत्न झाला. यात महादेव सुर्यवंशी मोटार जाळण्याचा प्रयत्न अज्ञाताने केला.

या घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक आमदार भिमराव तापकीर, नगरसेविका वर्षा तापकीर यांनी सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिपक निकम, गुन्हे निरिक्षक अप्पासाहेब वाघमळे यांना घटनास्थळी बोलावून वस्तुस्थितीची माहिती दिली. रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली. परिसरातील सीसीटीव्हीच्या फुटेजची माहिती घेणे सुरू आहे त्या आधारे आरोपींना दोन दिवसात शोध लावला जाईल, असे अाश्वासन पोलिस आधिकाऱ्यांनी दिले.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :
पुण्यात स्थायी समितीतून अध्यक्ष मोहोळच 'बाहेर'
सोनिया गांधींकडून विरोधकांसाठी 'डिनर'​
दिल्ली एनसीआरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के​
भाजपा म्हणते, राहुल गांधींचे जॅकेट 70 हजारांचे
आई-बाबा सांगा ना, आमची काय चूक...​
मृत तरुणी परत आल्याच्या अफवेने गोंधळ​
"हे राम' म्हटल्याबद्दलच्या विधानाचा विपर्यास​
सरकारी कर्मचाऱ्यांना रविवारी रजा नको; न्यायालयाची सूचना​
विकासवृद्धीसाठी झेपावे निर्यातीकडे!​

श्रीमंत देशांत भारत सहावा; अमेरिका प्रथम
तनिष्कने केली 1045 धावांची नाबाद विश्‍वविक्रमी खेळी​
दोषींवर कडक कारवाई करू; आदित्यनाथ यांनी मौन सोडले​

Web Title: Marathi news Pune news vehicle torched in Pune