शरद पवार यांच्या हस्ते १८ नागरिकांना मोफत कवळ्यांचे वाटप

राजकुमार थोरात
रविवार, 18 मार्च 2018

वालचंदनगर : माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील १८ नागरिकांना मुंबईमध्ये  मोफत दातांच्या कवळ्या देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

वालचंदनगर : माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील १८ नागरिकांना मुंबईमध्ये  मोफत दातांच्या कवळ्या देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामाने  इंदापूर तालुक्यामध्ये  या आठवड्यामध्ये मोफत दंत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये तालुक्यातील ८४८ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यातील १८ नागरिकांना कवळ्या बसविणे गरजेचे होते. शनिवार (ता.१७) रोजी १८  नागरिकांवरती मुंबईमध्ये  उपचार करुन आज रविवार (ता.१८) रोजी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते मोफत कवळ्या भेट देण्यात आल्या. यातील एका कवळीची किंमत अडीच लाख रुपये आहे. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने उपस्थित होते.यावेळी माने यांनी सांगितले की,माजी केंद्रीय मंत्री शरद पवार,खासदार सुप्रिया सुळे,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या सहकार्याने संपूर्ण पुणे जिल्हातील मोफत दंत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात येणार असुन जास्तीजास्त नागरिकांची माेफत तपासणी करुन उपचार करण्यात येणार अाहे. इंदापूर तालुक्यातील शिबिरासाठी इंडियन डेंटल मेडिकल डॉ. संतोष भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sharad pawar help walchandnagar news