मेलबर्न शहरात मराठी शाळा

अनुराधा धावडे
बुधवार, 2 जानेवारी 2019

पुणे - एकीकडे राज्यात मराठी शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडत आहेत, इंग्रजी शाळेत मुलांना प्रवेश घेण्यासाठी पालक दिवसरात्र शाळेच्या गेटसमोर उभे असतात. तर दुसरीकडे जिथे मराठीचा ‘म’ ही माहीत नाही, अशा आस्ट्रेलियातील मेलबर्न शहरामध्ये प्रसाद पाटील यांनी ‘संकल्प ः एक निश्‍चय’ ही मराठी शाळा ना नफा ना तोटा तत्त्वावर सुरू केली आहे. या शाळेत फक्त मराठी शिकविले जात नसून मुलांमध्ये  मराठी भाषा, संस्कृती, मराठीपण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न पाटील यांनी केला आहे.

मूळचे रत्नागिरीचे असलेले पाटील उच्च शिक्षण घेऊन नोकरीनिमित्त ऑस्ट्रेलियाला गेले. पण त्यांचा मुलगा आदित्य याने जेव्हा इंग्रजी भाषा शिकण्यास सुरवात केली, तेव्हा तो मराठी संस्कृती विसरून ऑस्ट्रेलियन संस्कृतीशी एकरूप होतोय की काय ? अशी शंका त्यांना भेडसावत होती. 

आदित्यला इंग्रजीसह मराठीही लिहिता वाचता आले पाहिजे, असे त्यांना नेहमी वाटत होते. त्यासाठी पत्नी हेमलता आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांशी चर्चा करून मराठी शाळा सुरू करण्याची कल्पना बोलून दाखविली. अनेक अडथळे पार करून संप्टेंबर २०१५ मध्ये ‘संकल्प’चा जन्म झाला. मराठी भाषा टिकविण्यासाठी, तिची संस्कृती जतन करण्यासाठी सुरवातीला दर शनिवारी सुरू झालेल्या या वर्गात पहिल्या वर्षी पाच ते तेरा या वयोगटातील मुलांनी प्रवेश घेतला. महाराष्ट्रातील आणि मेलबर्नमधील काही मराठी भाषिकांनी या शाळेच्या खर्चासाठी निधी पुरवला. या शाळेत सध्या शिशु व मोठा असे दोन वर्ग सुरू असून मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांना आता बऱ्यापैकी मराठी लिहिता वाचता येते. तर नवीन विद्यार्थ्यांना शिशु वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. या वर्गांची विभागणी मुलांच्या वयानुसार न करता त्यांच्या मराठीच्या ज्ञानावर केली आहे.

विनामूल्य ग्रंथालय सेवा 
वाचनसंस्कृती टिकून रहावी म्हणून येथे ‘मायबोली’ नावाने ग्रंथालय देखील सुरू करण्यात आले आहे. ग्रंथालयात दोनशेहून अधिक पुस्तके आहेत. यात कथा-कादंबरी, ललित, ऐतिहासिक, प्रवास वर्णन आदी पुस्तकांचा समावेश आहे. परदेशात राहणाऱ्या लोकांना मराठी पुस्तके वाचता यावीत, यासाठी ‘संकल्प’द्वारे सतत तीन वर्षे ही सेवा मराठी वाचकांना विनामूल्य मिळत आहे.

Web Title: Marathi schools in Melbourne city