drama competition in europe
sakal
पुणे - मराठी रंगभूमी ही महाराष्ट्रातील नाट्यपरंपरेचा अत्यंत समृद्ध आणि महत्त्वाचा भाग आहे. भारतातील सर्वांत प्रभावी नाट्यचळवळींपैकी एक म्हणून मराठी रंगभूमीकडे पाहिले जाते. या महान परंपरेचा वारसा लाभलेल्या मराठी रंगभूमीचे पडसाद आता युरोपमध्येही उमटू लागले आहेत.
याच नाट्यप्रेमाने आणि आपल्याला लाभलेल्या नाट्यकलेच्या समृद्ध परंपरेने प्रेरित होऊन ४ आणि ५ एप्रिल २०२६ रोजी नेदरलँड्स येथे युरोपमधील पहिली एकांकिका स्पर्धा अभिमंचतर्फे आयोजित करण्यात येत आहे.