मार्च महिन्यात बँका तब्बल १२ दिवस राहणार बंद

मार्च महिन्यात बँका तब्बल १२ दिवस राहणार बंद

Published on

मार्च महिन्यात बँकांना
१२ दिवस सुट्ट्या

कुर्डुवाडी, ता. ४ : मार्च महिन्यात १२ दिवस सुट्ट्या असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत. परंतु नेट बँकिंग, एटीएम, यूपीआयमुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी आधार मिळणार आहे.
आर्थिक वर्षासाठी मार्च महिना महत्त्वाचा आहे. सर्वांना मार्च एंडमध्ये सगळे आर्थिक व्यवहार पूर्ण करावयाचे असतात. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या मार्च ५ रविवार आले आहेत. त्यामुळे रविवारच्या ५ सुट्ट्या आणि दुसरा चौथा शनिवार अशा ७ नेहमीच्या सुट्ट्या आल्या आहेत. सध्या युपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याच बरोबर एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगचाही वापर ग्राहक करत असल्याने बँकेत जावे लागत नाही. परंतु चेकसह अन्य आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी आस्थापनांना, अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना बँकेत जावे लागते. त्यामुळे त्यांना वेळेत १९ दिवसात कामे पूर्ण करावी लागणार आहेत. राष्ट्रीयीकृत बँकेच्या माहितीनुसार १ मार्च रविवार, ३ मंगळवार धुलिवंदन,
८ मार्च रविवार, १४ मार्च दुसरा शनिवार, १५ रविवार, १९ गुरुवार गुढीपाडवा, २१ मार्च- शनिवार रमजान ईद, २२ मार्च रविवार, २६ मार्च गुरुवार श्रीराम नवमी, २८ चौथा शनिवार,
२९ रविवार, ३१ मार्च मंगळवार (महावीर जयंती). दरम्यान येथील व्यावसायिक कव्हे येथील वैभव चोपडे म्हणाले, बँक बंद असल्या तरी आम्ही बरीचशी आर्थिक व्यवहाराची कामे इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून करतो. त्यामुळे फारशी अडचण येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com