Mardani Dasara Celebrated Successfully on Fort Rajgad
sakal
वेल्हे, (पुणे) - छत्रपती शिवरायांची स्वराज्याची पहिली राजधानी राहिलेल्या किल्ले राजगडावर (ता. राजगड) शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत मर्दानी दसरा मोठ्या उत्साहात पार पडला.
किल्ले राजगडवर सालाबादप्रमाणे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या व स्वराज्यभूमी बारा मावळ विभागाच्या दुर्गसेवकांनी दसरा सिमोल्लंघन सोहळा पार पाडला. गेली अनेक वर्षे “सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान” च्या माध्यमातून या पवित्र राजगडवर दुर्ग संवर्धनाचे कार्य सुरू आहे.