

Marigold flowers bloom in fields near Alephata in Junnar taluka as farmers face falling market prices.
esakal
राजेश कणसे
आळेफाटा : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना मोठी मागणी राहून चांगला बाजारभाव मिळेल, अशी अपेक्षा जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना होती. मात्र, ऐन सणासुदीच्या काळातच झेंडूच्या फुलांचे बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. सध्या झेंडूच्या फुलांना प्रतिकिलो अवघा ३० ते ४० रुपये दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे.