पुणे : विद्यापीठात लवकरच सागरी सुरक्षिततेबाबत पदव्युत्तर अभ्यासक्रम | Maritime security | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maritime security

पुणे : विद्यापीठात लवकरच सागरी सुरक्षिततेबाबत पदव्युत्तर अभ्यासक्रम

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग आणि नवी दिल्ली (Delhi) येथील नॅशनल मेरिटाईम फाउंडेशनच्यावतीने विद्यापीठात लवकरच ‘अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस फ्रेमवर्क’ या विषयात पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू होणार आहे.

विद्यापीठाचा संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग आणि नॅशनल मेरिटाईम फाउंडेशन यांच्यामध्ये सागरी सुरक्षेसाठी समर्पित संशोधन आणि धोरणात्मक विकासासाठी सामंजस्य करार येत्या सोमवारी (ता. २७) विद्यापीठात करण्यात येणार आहे. यावेळी नॅशनल मेरीटाइम फाउंडेशनचे महासंचालक व्हाइस ॲडमिरल प्रदीप चौहान (निवृत्त) उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात चौहान हे ‘युद्धनौकांचा ऐतिहासिक आणि समकालीन विकास : ‘प्रकार’, ‘वर्ग’, ‘प्रकल्प’ आणि युद्धनौकांची अंतर्निहित वैशिष्ट्ये’ विषयावर व्याख्यान देणार आहेत.

हेही वाचा: राज्य परीक्षा परिषदेच्या ‘आयुक्त’पदावर प्रश्नचिन्ह

या कराराअंतर्गत विद्यापीठात ‘अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस’ हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. सागरी दृष्टिकोनातून धोरणात्मक, भू-राजकीय सागरी सुरक्षा समजून घेणे, हा अभ्यासक्रमाचा समग्र दृष्टिकोन आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पर्यावरण नियामक संस्था किंवा पाण्याखालील ध्वनी निर्मिती आणि सागरी अधिवास, ऑफ शोअर ऑइल प्लॅटफॉर्म आणि पाइपलाइनवर होणारा परिणाम , तपासणी आणि देखभाल, डीप सी डायव्हिंग, रिक्रिएशन डायव्हिंग या क्षेत्रात काम करणाऱ्यासाठी पर्यावरण नियामक संस्थांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकणार आहे.

Web Title: Maritime Security Pune University Syllabus

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsUniversity
go to top