Market Committee : पुण्यात उत्पन्न बाजार समितीने व्यापाऱ्यांच्या दफ्तरांची तपासणी सुरू करताच पहिल्याच अडत्याकडे सहा लाख रुपयांचा सेस फरक आढळला, त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पुणे : उत्पन्न बाजार समितीने तरकारी, फळे, कांदा- बटाटा या विभागांसह भुसार बाजारातील अडत्यांची दफ्तरतपासणी सुरू केली. त्यात फळ बाजारातील पहिल्याच अडत्याकडे तब्बल सहा लाखांचा फरक निघाला. त्यामुळे उपकराची (सेस) चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले.