दौंड बाजारात हरभऱ्याचा बाजारभाव वधारला

दौंड बाजारात हरभऱ्याचा बाजारभाव वधारला

दौंड, ता. १६ : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात हरभऱ्याची आवक वाढली असून, बाजारभावात देखील वाढ झाली आहे. हरभऱ्याची २०६ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतवारीनुसार किमान ४१०० रुपये तर कमाल ६३७० प्रतिक्विंटल, असा असा बाजारभाव मिळाला आहे.

भुसार व भाजीपाल्याची मालाची आवक कमी झाली असून, बाजारभाव तेजीत आहेत. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक स्थिर असून बाजारभाव तेजीत आहे. असह्य उकाड्यानंतर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतमालाची आवक कमी झाली आहे. परंतु भाजीपाल्याचे बाजारभाव वाढले आहेत.
कोथिंबिरीची ६७८० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ३०० रुपये तर कमाल २००० रुपये जुडी,असा बाजारभाव मिळाला. मेथीची ८७० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ८०० व कमाल १६०० रुपये असा बाजारभाव मिळाला.

शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू ६६१ २१०० ३२५१
ज्वारी ४७३ २००० ४१००
बाजरी १२९ २००० ३२००
हरभरा २०६ ४१०० ६३७०
मका ०६२ १८५० २२००
मूग ११० ७२०० ८१००


भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : बटाटा-२६०, आले-१०००, गाजर-२५०, काकडी-१५०, भोपळा-१००, कोबी-१३०, फ्लॅावर-२५०, टोमॅटो-१२५, हिरवी मिरची-७००, भेंडी-४५०, कार्ली- ५००, दोडका-४१०, वांगी-३२०, शेवगा-५००, कलिंगड-१२०.

कांदा २१०० रुपये क्विंटल
केडगाव उपबाजारात कांद्याची १४१६५ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतवारीनुसार किमान ८०० व कमाल २१०० रुपये असा बाजारभाव मिळाला. अवकाळी पावसानंतर मागणी कमी झाल्याने लिंबाच्या दर देखील पडले आहेत. केडगाव उपबाजारात लिंबाची २२ डाग आवक झाली.


चवळी तेरा हजार रुपये क्विंटल
केडगाव उपबाजारात तुरीची अठरा क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार किमान ८००० रुपये तर कमाल १०३०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे. तर चवळीची चौदा क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतवारीनुसार किमान ९५०० रुपये तर कमाल १३००० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com