
Pune Market Yard
Sakal
मार्केट यार्ड : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत काही अडत्यांकडून नियमांना फाटा देत रस्त्यातच शेतमालाची विक्री सुरू केली आहे. गाळे रिकामे ठेवून थेट रस्त्यांच्या मधोमध वाहने उभी करून शेतमालाची विक्री चालवली आहे.
परिणामी रविवारी मार्केट यार्ड परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. शेतकरी आणि खरेदीदार या दोघांनाही मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. मात्र, बाजार समिती प्रशासनाने या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे बोलले जात आहे.