Pune News : मार्केटयार्डात मोक्याच्या ठिकाणी थाटल्या टपऱ्या; संचालकानेच टपरी टाकल्याची चर्चा

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मोक्याच्या ठिकाणी टपऱ्या थाटल्या जात आहेत.
Market yard Illegal Tapari
Market yard Illegal Taparisakal

मार्केट यार्ड - पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मोक्याच्या ठिकाणी टपऱ्या थाटल्या जात आहेत. यामधे एका संचालकांनेच शिफारस करून दोन कार्यकर्त्यांच्या नावाने दोन टपऱ्या टाकल्याची माहिती समोर आली आहे. शेतमालाला बाजारभाव मिळवून देण्यापेक्षा अन्य उद्देशच मुख्य बनले असल्याची चर्चा बाजार घटकांमध्ये आहे.

बाजार आवारातील मोक्याच्या ठिकाणी अनधिकृत टपऱ्यांचे पेव फुटले आहे. बाजार समितीत संचालक मंडळ निवडून आल्यानंतर काही संचालक शेतकऱ्यांचे हित जपण्याऐवजी स्वतःचे हित जपत असल्याचे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. बाजारात शिवनेरी रस्त्यावरील भुसार बाजारालगतच्या व्यापारमहर्षी बाबा पोकर्णा यांच्या पुतळ्याशेजारीच अनधिकृतपणे टपरी थाटली होती. परंतु तक्रारी झाल्यानंतर ती टपरी उचलली आहे.

तत्कालीन प्रशासकांच्या काळात बाजाराला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या हटविल्या होत्या. मात्र, आता संचालक मंडळ आल्यानंतर मोक्याच्या ठिकाणी पुन्हा टपऱ्या टाकण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे बाजारात वाहतूककोंडी निर्माण होत आहे. तसेच वाहतूककोंडीमुळे शेतमाल खरेदी करण्यास येणाऱ्या व्यापाऱ्यांना देखील त्रास होत आहे.

कोंडीमुळे अनेकदा शेतमाल शिल्लक राहत असल्याचेही काही व्यापाऱ्यांनी सांगितले. संचालक मंडळाच्या काळात अनधिकृतपणे थाटलेल्या टपऱ्या हटवाव्यात, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, टपऱ्या थाटण्याची कामे ही बाजारातील अतिक्रमण विभागातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून केली जात असल्याची चर्चा आहे.

अनधिकृत टपऱ्या तातडीने काढण्यात येतील. तसेच ज्या टपऱ्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्या टपऱ्यांची जागा बदलण्यात येईल.

- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com