
मार्केट यार्ड : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या भुसार विभागात ज्या वस्तूंवर बाजार फी (सेस) घेतली जात नाही, अशा सर्व प्रकारच्या वस्तूंवर एक टक्का ‘यूजर चार्जेस'' (वापर आकार) आकारण्यासाठी बाजार समितीने राज्याच्या पणन संचालकांकडे फेरप्रस्ताव दाखल केला आहे. यामुळे वर्षाकाठी १७ ते १८ कोटींनी उत्पन्न वाढणार असल्याचे समितीने दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे, तर दुसरीकडे या निर्णयाला भुसार बाजारातील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे.