divorce
sakal
पुणे - विवाहानंतर कोणतेही शारीरिक संबंध प्रस्थापित न झाल्याने विवाह रद्द करण्यासाठी न्यायालयात गेलेल्या पत्नीला त्वरित दिलासा मिळाला. पतीने लेखी, बिनशर्त कबुली दिल्याने त्यावर आधारित कायदेशीर तरतुदींचा प्रभावी वापर करत येथील कौटुंबिक न्यायालयाने त्वरित विवाह रद्द करण्याचा निर्णय दिला. वादग्रस्त तथ्य नसल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाने दीर्घ सुनावणी टाळून हा निर्णय दिला.