
पुणे : तुमचे आणि माझे विचार खूप वेगळे आहेत. त्यामुळे आपले पटणार नाही. माझ्याशी शरीर संबंध ठेवले तर मी आत्महत्या करेल, असं लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नीने पतीला सांगितलं. त्यामुळे लग्नगाठीसह सुरू झालेले त्यांच्यातील वाद वाढतच गेले. चार महिने देखील त्यांचे लग्न टिकू शकले नाही. त्यामुळे मुलाने आता तिच्यापासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ऋषिकेश आणि कोमल (नावे बदललेली) असं या जोडप्याचे नाव. ऋषिकेश व्यवसाय करतो तर असून तर कोमल ही गृहिणी आहे. त्यांचे फेब्रुवारीमध्ये अरेंज मॅरेज झाले असून दोघांचीही वये 25 च्या आतील आहेत होते. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कोमलने ऋषिकेशला सांगितले की, विचार वेगळे असल्याने आपले पटणार नाही. माझ्याशी जबरदस्ती शरीर संबंध ठेवले तर मी आत्महत्या करेल. तुझ्या व कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हा दाखल करीन. त्यामुळे त्याने हा सर्व प्रकार त्याच्या व कोमलच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये बैठक होऊन कोमलला समजावण्यात आले. तिने कोणाचेही न ऐकता आपले विचार ठाम ठेवले. लग्नानंतर दोन-तीन महिने असाच प्रकार सुरू राहिला. तिच्या सततच्या धमक्यांनामुळे ऋषिकेश भीतीच्या छायेत जगत होता.आपली चूक नसतानाही तिला जर काही झाले तर पोलिस आणि कोर्ट-कचेरीचा ससेमिरा मागे लागेल. त्यामुळे त्याने जूनमध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ऋषिकेश कॉलेजला असताना त्याचे एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. मात्र तिच्याबरोबर लग्न करण्यास कुटुंबियांनी विरोध केला होता. हे विसरून कोमलबरोबर जीवन प्रवास करण्याचा निर्णयही त्याने घेतला होता. हा सर्व प्रकार त्याने कोमलला लग्नापूर्वीच सांगितला होता.
तर कारणे स्पष्ट करावी लागता :
लग्नानंतर एका वर्षाच्या आतच घटस्फोट घ्यायचा असेल तर त्यामागील कारणे काय आहेत हे न्यायालयाला सांगावे लागतात. याबाबत अर्ज दाखल केल्यानंतर त्यावर सुनावणी होऊन न्यायालय योग्य ते आदेश देते. असे प्रकार खूप कमी वेळा होत असतात. लॉकडाऊन पूर्वीच्या अशा एका प्रकरणात संमतीने घटस्फोट घेण्यात आला होता, अशी माहिती ऋषिकेशचे वकील सुप्रिया कोठारी यांनी दिली.
लग्नानंतरचे पती पत्नीतील शरीर संबंध हा लग्नाचा एक पाया आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्देश आहेत. नवरा बायकोमधील सुखी जीवनासाठी शारीरिक संबंध देखील महत्त्वाचे असतात. त्यामुळे लग्नानंतर शरीरसंबंधास नकार देणे, हे एक प्रकारे मानसिक त्रास देणारे कृत्य आहे. -ऍड. सुप्रिया कोठारी
का होतात असे प्रकार?
- दबावाखाली लग्न केले असेल
- दुसऱ्या व्यक्तीबरोबर प्रेम संबंध असतील
- शरीर संबंध ठेवण्यास सक्षम नसेल
- समलैंगिक व्यक्तीबाबत आकर्षण असेल
- साथीदार एकमेकांच्या मानसिक स्थितीचा विचार करत नसेल
- शारीरिक संबंधाबाबतचे गैरसमज
(Edited by : Sagar Diliprao Shelar)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.