कोरोनामुळे ऐन लग्नसराईत मंगल कार्यालयांवर मोठे संकट

Marriage Hall owners problems due to Strict Rules and regulations for Corona
Marriage Hall owners problems due to Strict Rules and regulations for Corona
Updated on

कात्रज : गेल्या वर्षभरात लॉकडाऊन काळात जवळपास ९ महिने मंगल कार्यालये बंद अवस्थेत होती. काही प्रमाणात कोरोनानंतर सुरु झालेली शहरातील मंगल कार्यालये कात टाकण्याच्या मार्गावर असतानाच पुन्हा बंद होऊ लागली आहेत. पुन्हा लॉकडाऊनच्या चर्चा आणि कोरोनामुळे करण्यात आलेल्या कडक नियमावलीमुळे मंगल कार्यालयांची अवस्था दयनीय झाली आहे. जवळपास ३५ टक्के मंगल कार्यालये तर पुन्हा चालूच करण्यात आलेली नाहीत.

गेल्या महिनाभरांपासून कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने गंभीर बाब लक्षात घेत सर्व मंगल कार्यलय आणि हॉल यांना नोटीसा पाठवल्या आहेत. या नोटीसीद्वारे कोरोना काळात घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या मंगल कार्यालयांचा व्यवसाय सुरु होण्याच्या मार्गावर असतानाच आणि लग्नसराई सुरु होण्याच्या तोंडावर कोरोना संसर्ग वाढल्याने हा व्यवसाय पुन्हा अडचणीत सापडला आहे. सिंहगड रस्ता, कोरेगाव पार्क, कात्रज, धायरी, नऱ्हे, देहूरोड बाह्यवळण रस्ता परिसर या भागांत या व्यवसायाला सर्वाधिक फटका बसला आहे.

पुन्हा पुर्ण ताकदीने हा व्यवसाय सुरु होईल की नाही या भितीने अनेक व्यावसायिकांनी व्यवसाय सुरु केला नव्हता. लोकांसाठी पूर्ण क्षमतेने परवानगी मिळाल्यानंतरच व्यवसाय सुरु करु या भावनेतून आणि अपेक्षित व्यवसाय होणार नसल्याने थांबण्याचा निर्णय अनेकांनी घेतला होता.

कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी कपात
कोरोनाच्या आधी या क्षेत्रात केटरिंग सुविधा देणारे कामगार पकडून सुमारे एक ते सवा लाख कामगार कार्यरत होते. मात्र मोठ्या उपस्थितांच्या संख्येवर बंधने आल्याने तेथे कामाला असलेल्यांचा रोजगार बुडाला आहे. तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे.

मंगल कार्यालये बंद असण्याची कारणे 

  • उपस्थितांची मर्यादेनुसार मिळणारी रक्कम न परवडणारी
  • मिळणारा नफा तुलनेने खूप कमी
  • व्यवसाय होईल की नाही याची भिती
  • पुन्हा लॉकडाऊन झाले तर मोठे नुकसान होईल याची भिती
  • कडक नियमावलीचा मोठा ताण 

''कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंगल कार्यालयाचा व्यवसाय वर्षभरापासून बंद आहे. व्यवसाय नसल्याने महिन्याचा खर्चही भागवणे अवघड झाले आहे. व्यवसाय चालू करण्यासाठी लागणारा खर्च निघेल की नाही या भितीने अनेकांनी व्यवसाय चालूच केला नाही.''
- कुणाल बेलदरे, व्यावसायिक, कात्रज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com