Electric Shock : थेऊरमध्ये विजेचा धक्का लागून विवाहितेचा मृत्यू

धुतलेले कपडे वाळत घालण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेला विद्युत तारांचा धक्का लागून तिचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील काकडे कॉलनी परिसरात घडली.
Vaishali Narute

Vaishali Narute

sakal

Updated on: 

थेऊर - धुतलेले कपडे वाळत घालण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेला विद्युत तारांचा धक्का लागून तिचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील काकडे कॉलनी परिसरात घडली. ही घटना शनिवारी (ता. ३१) दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेमुळे थेऊरसह परिसरात शोककळा पसरली असून, दोन मुलांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे. वैशाली विकास नरुटे (वय अंदाजे- ३५, रा. चिंतामणी विद्यालयाजवळ, थेऊर, ता. हवेली) असे मृत महिलेचे नाव आहे.

Loading content, please wait...