

वालचंदनगर, ता. २ ः लग्नानंतर विवाहित महिलांचे थांबलेले उच्च शिक्षण सुरू करण्यासाठी कळंब (ता. इंदापूर) येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाने पुढाकार घेतला असून विवाहित महिलांना कला (आर्टस) शाखेमध्ये नाममात्र १०० रुपयांमध्ये पहिल्या वर्षाला प्रवेश मिळणार आहे.
रणसिंग महाविद्यालयाने सध्या अनेक उपक्रम सुरू केले असून काळानुसार शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल केले असून इंग्लिश मिडीयमसह अनेक नवीन कोर्सेस सुरू केले आहेत. ग्रामीण भागामध्ये लग्नानंतर बहुतांश मुलींचे उच्च शिक्षण थांबत असल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याने इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या विश्वस्त राही वीरसिंह रणसिंग यांच्या संकल्पनेतून विवाहित महिलांचे बंद पडलेले शिक्षण सुरू करण्यासाठी कला शाखेमध्ये प्रवेश घेण्यासाठी विवाहित महिलांना १०० रुपये नाममात्र फीमध्ये पहिल्या वर्षासाठी प्रवेश मिळणार आहे.
प्राचार्य डॉ. अशोक काळंगे म्हणाले, ‘‘विवाहित मुलींसाठी संस्थेने अभिनव उपक्रम सुरू केला आहे. महिला बारावी पास असणे आवश्यक असून किमान दोन वर्षाचा गॅप असावा. या योजनेमध्ये प्रवेश घेणाऱ्या महिलांना शैक्षणिक वर्षातील फी माफ होणार आहे. आत्तापर्यंत या योजनेमध्ये १५पेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या असून त्यांचे थांबलेले शिक्षण पुन्हा सरू झाले आहे. इंदापूर, माळशिरस, बारामती, फलटण तालुक्यातील जास्तीतजास्त महिलांना या योजनेचा लाभ घ्यावा. ’’
यासंदर्भात इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग म्हणाले, ‘‘दिवंगत विश्वासराव (दादा) रणसिंग यांनी ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी महाविद्यालय सुरू केले होते. याचा हजाराे मुलींना फायदा झाला. दादांच्या पावलावरती पाऊल ठेऊन आम्ही महिलांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करीत आहोत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.