शहीद जवान सुजित किर्दत, नागनाथ लोभे यांना पुणे विमानतळावर लष्कराकडून सलामी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Martyred soldiers Sujit Kirdat and Nagnath Lobhe were saluted by the Army at Pune Airport

सातारा तालुक्यातील चिंचणेर निंब येथील जवान सुजित किर्दत शहीद झाले आहेत तर लातूरमधील जवान लोभे नागनाथ सिक्कीममध्ये कार्यरत होते. सुजित किर्दत 106 इंजिनिअर रेजिमेंट सिक्किम याठिकाणी ड्युटीवर होते.

शहीद जवान सुजित किर्दत, नागनाथ लोभे यांना पुणे विमानतळावर लष्कराकडून सलामी

पुणे : शहीद जवान सुजित किर्दत यांचं पार्थिव सातारयाकडे रवाना तर शहीद जवान लोभे नागनाथ यांचं पार्थिव लातूरकडे रवाना करण्यात आले आहे. दोन्ही जवानाची पार्थिव पुण्यात आणण्यात आली असून पुणे विमानतळावर लष्कराकडून त्यांना सलामी देण्यात आली. इ. जी. कमांडड ब्रिगेडियर एम. जे. कुमार व इतर 5 लष्करी अधिकारी यांनी श्रद्धांजली वाहून जवानांनी सलामी दिली.

सातारा तालुक्यातील चिंचणेर निंब येथील जवान सुजित किर्दत शहीद झाले आहेत तर लातूरमधील जवान लोभे नागनाथ सिक्कीममध्ये कार्यरत होते. सुजित किर्दत 106 इंजिनिअर रेजिमेंट सिक्किम याठिकाणी ड्युटीवर होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ड्युटी बजावत असताना बर्फावरुन जिप्सी गाडी घसरुन दरीत कोसळली यामध्ये सुजित किर्दत व नागनाथ लोभे यांना वीरमरण आले आहे. सुजित यांचं पार्थिव आता पुण्यातून साताराकडे रवाना करण्यात आलं तर लोभे यांचं पार्थिव लातूरकडे रवाना करण्यात आलं

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top