

माळेगाव : आधुनिक शेतीला नवं रूप देणारे कृषिक प्रदर्शनात यंदा ११ कोटी रुपये किंमतीचा मारवाडी जातीचा घोडा, १५०० किलो वजनाचा १ कोटी रुपये किमतीचा कमांडो नावाचा रेडा आणि मुका घेणारी सोन्या-मोन्या ही बैल जोडी बारामतीच्या `कृषिक`मध्ये गाजतायेत. याशिवाय ग्लोबल ते लोकल कृषी तंत्रज्ञान घेऊन आलेल्या कृषिक प्रदर्शनात यंदा नव संशोधकांचे शेती व शेतीपूरक प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहेत.