पाककृती मसूर कोबी रोल

पाककृती मसूर कोबी रोल
Published on

मसूर कोबी रोल
साहित्य ः मसूर डाळ एक वाटी, पत्ताकोबी २० पाने, कोथिंबीर-हिरवी मिरची-लसूण-आलं वाटण दोन चमचे, हळद अर्धा छोटा चमचा, धने-जिरे पावडर एक चमचा, तांदूळ पिठी दोन चमचे, ओवा एक चमचा, मीठ चवीप्रमाणे, मुठभर कोथिंबीर, तेल गरजेनुसार.

कृती ः मसूर डाळ ५-६ तास भिजवून त्यातील पाणी निथळून घ्या. ही डाळ आता मिक्सरला वाटून घ्या. त्यात हळद, मीठ, धने-जिरे पावडर, ओवा, वाटण, तांदूळ पिठी हे सर्व एकजीव करून घ्या. पत्ताकोबीची पाने सुटी करून घ्या. एक-एक पान वेगळे करून घ्या. या पानावर डाळीचे मिश्रण लावून ते गुंडाळून त्याचे रोल करा. आता हे रोल चाळणीमध्ये ठेऊन वाफवून घ्या. वाफवलेले रोल तळून किंवा सॅलो फ्राय करून त्याचा आस्वाद घ्या.

Marathi News Esakal
www.esakal.com