HSC Exam Mass Copying Case : सामूहिक कॉपी प्रकरणी २६ कर्मचारी निलंबित; गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश

वाशीम जिल्ह्यातील सामूहिक कॉपी प्रकरणात गुन्हा दाखल करून संबंधितांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.
hsc exam copy case

hsc exam copy case

sakal

Updated on

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत वाशीम जिल्ह्यातील श्री मैनागिरी महाराज विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय टो-जुमडा येथे सामूहिक कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर राज्य मंडळाने आणि जिल्हा दक्षता समितीने कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणी २६ जणांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com