Wagholi Furniture Factory Fire
sakal
पुणे
Wagholi Fire : वाघोलीत फर्निचर कारखान्याला आग; कारखाना जळून खाक, कोट्यवधीचे नुकसान
वाघोलीतील जगताप वस्ती परिसरातील फर्निचर कारखान्याला आग लागल्याची घटना गुरुवारी घडली.
वाघोली - वाघोलीतील जगताप वस्ती परिसरातील फर्निचर कारखान्याला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये कारखाना पूर्ण जळून खाक झाला. पी एम आर डी ए व महापालिका अग्निशमन दलाच्या ७ ते ८ गाड्यांना आग नियंत्रणात आणण्यास सहा ते सात तास लागले. यामध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले.
