ration card
sakal
पुणे - राज्यातील शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन सुधार अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील ६८ हजार लाभार्थी वगळण्यात आले आहेत. आधार क्रमांक आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील माहितीच्या आधारे जिल्हानिहाय संशयास्पद लाभार्थ्यांची यादी करून पुरवठा निरीक्षकांमार्फत घरोघरी तपासणी करून हा निर्णय घेण्यात आला आहे.