
पुरी : जगन्नाथ पुरी येथे येत्या शुक्रवारी (ता.२७) होणाऱ्या रथयात्रेच्या सुरक्षेसाठी प्रशासनच्या वतीने सुमारे दहा हजार जवान तैनात करण्यात आले असल्याने पुरीला लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे. त्याव्यतिरिक्त शहरात टेहळणीसाठी विविध ठिकाणी कृत्रिमबुद्धीमत्तेचा (एआय) समावेश असलेले २५० अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.