
चाकण : येथे चाकण- शिक्रापूर मार्गावर शनिवारी (ता. २१) सकाळी चाकण ते रासे फाटा या दरम्यान दहा अवजड वाहने बंद पडली. ही वाहने बाजूला करण्यासाठी मोठ्या दोन क्रेन आणाव्या लागल्या. त्यामुळे चाकण- तळेगाव, चाकण- शिक्रापूर या मार्गावर वाहनांच्या रांगा अगदी दहा किलोमीटरपर्यंत गेल्या होत्या. त्यामुळे नागरिक, कामगार वर्ग संतप्त झाला आहे.