

voter list
sakal
पुणे - महापालिकेच्या प्रारूप मतदारयादीवर हजारो हरकती व सूचना आल्या होत्या. त्यामध्ये एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागामध्ये मतदारांची नावे जाण्याचा प्रकार मोठा होता. ९२ हजारांहून अधिक मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याचे उघड झाले आहे.
महापालिकेने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीनंतर मतदारांची नावे मोठ्या संख्येने इतर प्रभागांमध्ये जाण्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे.