सह्याद्री शिक्षणशास्त्र महाविद्यालयात नवीन अभ्यासक्रम

सह्याद्री शिक्षणशास्त्र महाविद्यालयात नवीन अभ्यासक्रम
Published on

सोमेश्वरनगर, ता. १४ : वाघळवाडी (ता. बारामती) येथील समर्थ ज्ञानपीठ संचलित सह्याद्री शिक्षणशास्त्र महाविद्यालयास नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने मास्टर ऑफ आर्ट्स इन एज्युकेशन या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अध्यापनासाठी मान्यता दिली आहे. यामुळे बारामतीसह आजूबाजूच्या तालुक्यांमधील विद्यार्थी-शिक्षकांसाठी अधिक शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
सह्याद्री शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने डीएलएड (डिप्लोमा इन एज्युकेशन), बी. एड. (बॅचलर इन एज्युकेशन) हे अभ्यासक्रम १६ वर्षांपासून सुरू आहेत. मात्र बी.एड. नंतरचे शिक्षण घेण्याची संधी बारामतीसह आजूबाजूच्या तालुक्यात नव्हती. आता सह्याद्रीस या अभ्यासक्रमासाठी मान्यता मिळाल्याने पदवीधर विद्यार्थी, शिक्षक किंवा शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी यांना शिक्षणशास्त्र विषयात उच्च शिक्षण घेता येणार आहे. आधुनिक शिक्षणपद्धती, शैक्षणिक व्यवस्थापन, संशोधन, शैक्षणिक नेतृत्व, अध्यापनशास्त्र, शिक्षणातील बदलते प्रवाह अशा विषयांचा अभ्यास या पदवीमध्ये करता येणार आहे. संस्थाध्यक्ष अजिंक्य सावंत म्हणाले, ‘‘हा अभ्यासक्रम मुक्त विद्यापीठाचा असल्याने नोकरी किंवा व्यवसाय सांभाळून उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना हे शिक्षण घेता येईल. कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण असलेला विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com