Iiser pune : आयसरमध्ये क्वांटम तंत्रज्ञानात पदव्युत्तर पदवी

राष्ट्रीय क्वांटम मोहिमेसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे (आयसर) येथे क्वांटम तंत्रज्ञानात पदव्युत्तर पदवी (मास्टर्स) अभ्यासक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.
Iiser pune
Iiser punesakal

पुणे : राष्ट्रीय क्वांटम मोहिमेसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे (आयसर) येथे क्वांटम तंत्रज्ञानात पदव्युत्तर पदवी (मास्टर्स) अभ्यासक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरू होत आहे.

महासंगणकानंतर आता जगाचे लक्ष क्वांटम संगणकाच्या निर्मितीकडे लागले आहे. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल करणारे हे भविष्यकालीन तंत्रज्ञान अगदी आपल्या उंबरठ्यावर येऊन थांबले आहे. त्यात देश म्हणून आपण मागे राहू नये म्हणून राष्ट्रीय क्वांटम मोहिमेची आखणी करण्यात आली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून हा दोन वर्षाचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आयसरमध्ये सुरू होत आहे. उद्योगांचा थेट सहभाग आणि नवउद्योजकतेला संधी हे अभ्यासक्रमाचे मुळ सूत्र असणार आहे. आयसरच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुदर्शन अनंत सांगतात, ‘‘अभ्यासक्रमासाठी आयसरमध्ये दोन नवीन प्रयोगशाळा विकसित करण्यात आल्या आहेत. ज्याद्वारे क्वांटम क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण दिले जाईल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर हा अभ्यासक्रम सुरू होत आहे.’’

आयसर पुणे मध्येच विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे क्वांटम हब स्थापन करण्यात आले आहे. ज्यामध्ये १२ प्राध्यापक कार्यरत आहेत. राष्ट्रीय क्वांटम मोहिमेचे नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजय चौधरी यांच्या उपस्थितीत १० एप्रिलरोजी हा अभ्यासक्रम घोषित करण्यात आला.

महत्त्वाचे :

  • - अभ्यासक्रमाची जाहिरात : जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात

  • - अभ्यासक्रमाची सुरवात : ऑगस्ट २०२४

  • - प्रवेशासाठी पात्रता :

    १) भौतिकशास्त्र किंवा समकक्ष अभ्यासक्रमातून बीएस्सी

२) आयआयटी जॅम पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

३) क्वांटम तंत्रज्ञानात काम करणाऱ्या उद्योगांतील प्रतिनिधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com