मसूर : मसूर गट व गण ठरणार राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेचा (चौकटी विचारात घ्याव्यात महत्त्वाच्या आहेत)

मसूर : मसूर गट व गण ठरणार राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेचा (चौकटी विचारात घ्याव्यात महत्त्वाच्या आहेत)

Published on

मसूरमध्ये तिरंगी लढतीची शक्यता

भाजपचे वारू रोखण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीची रणनीती

संदीप पारवे ः सकाळ वृत्तसेवा

मसूर, ता. २० : कऱ्हाड तालुक्यातील मसूर गट हा राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा मानला जातो. मसूर गट व गण दोन्ही सर्वसाधारण पुरुषांसाठी, तर वडोली- भिकेश्वर गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीला लागले आहेत. मसूर गटात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी अटीतटीची लढत होण्याची शक्यता असून, अनेक इच्छुक असल्याने तिरंगीप्रसंगी चौरंगीही लढत पाहावयास मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या आमदार मनोज घोरपडे यांचा वारू रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस किती ताकद लावणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या मतदारसंघात मसूर, किवळ, हेळगाव, कालगाव ही गावे सर्वाधिक मतांची गावे असून, मसूर गट व गण राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा ठरणार आहे. मसूर गटात एकूण ३६,०३९ मतदान आहे. गटावर सुरुवातीपासून राष्ट्रवादीचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २००७ च्या निवडणुकीत काका- बाबा गट एकत्र आल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता, तो अपवाद वगळता माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मानसिंगराव जगदाळे यांचे आजअखेर राष्ट्रवादीचेच प्राबल्य राहिले आहे. विधानसभा निवडणुकीत आमदार मनोज घोरपडे यांना मिळालेल्या मतांचा टक्का चांगलाच वाढला आहे. मसूर गटावर अनेक काळ वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादीकडून मानसिंगराव जगदाळे हे प्रबळ दावेदार असतील. मात्र, त्यांच्या विरोधात नेहमीच जगदाळे विरुद्ध जगदाळे असा सामना पाहावयास मिळाला. आताही तोच सूर आळवताना मसूरची जनता दिसत आहे. मानसिंगराव जगदाळे यांच्या विरोधात मसूरमधून नंदकुमार जगदाळे, लालासाहेब जगदाळे, की अन्य एखादा चेहरा समोर येतोय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
त्याचबरोबर खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक कुलदीप क्षीरसागर, लाडकी बहीण योजनेच्या तालुकाध्यक्षा दीपाली खोत, युवा नेते पवन निकम, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, राष्ट्रवादीच्या संगीता साळुंखे, सह्याद्रीचे माजी संचालक लालासाहेब पाटील, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. विजयराव साळुंखे, कवठेचे प्रशांत यादव आदींची नावे आघाडीवर आहेत. मसूर गणासाठी निगडी सोसायटीचे माजी अध्यक्ष संजय घोलप, किवळचे माजी पंचायत समिती सदस्य डॉ. विजयराव साळुंखे, माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे, निगडीचे डॉ. संतोष पाटील, चिखलीचे संदीप सावंत यांच्या कार्यकर्त्यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचे बोलले जात आहे, तर वडोली भिकेश्वर गणात काँग्रेसचे प्रशांत पवार, कवठेचे प्रशांत यादव, खराडे गावाचे मधुकर जाधव, संतोष जाधव हे पत्नीच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्याचबरोबर इतर अनेक जण निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.

चौकट
भाजप- उंडाळकर गटाची युती एकत्र?

विधानसभा निवडणुकीत मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांच्यामध्ये मनोमिलन झाले होते; परंतु सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीवरून भाजपच्या गोटात शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. त्यातच तिकीट वाटपात जुन्या चेहऱ्यांऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यास भाजपचा कस लागणार असल्याचे मतदारसंघातील हालचालीवरून स्पष्ट दिसत आहेत, तसेच त्यांना उंडाळकर गटाचीही मदत झाली होती. या निवडणुकीतही त्यांची युती होणार का? यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे.

PNE26V88083
१) मानसिंगराव जगदाळे

PNE26V88088
२) लालासाहेब जगदाळे

PNE26V88089
३) नंदकुमार जगदाळे

PNE26V88090
४) कुलदीप क्षीरसागर

PNE26V88091
५) पवन निकम

PNE26V88092
६) दीपाली खोत

PNE26V88093
७) संगीता साळुंखे

PNE26V88094
८) डॉ. विजय साळुंखे

PNE26V88095
९) संजय घोलप

PNE26V88096
१०) प्रियांका पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com