उपवर्गीकरण बातमी

उपवर्गीकरण बातमी
Published on

PNE26W19851

अहिल्यानगर ः सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानतर्फे शासकीय विश्रामगृहात आयोजित सकल मातंग समाजाची बैठकीस उपस्थित समाज बांधव.


उपवर्गीकरणाचा प्रश्न निकाली काढावा
नामदेवराव चांदणे ः मातंग समाजाची बैठक

अहिल्यानगर, ता. १७ ः मातंग समाजाच्या न्याय हक्कांसाठी समाज एकत्र येणे काळाची गरज आहे. शासनाने उपवर्गीकरणाचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, यासाठी समाजाने संघटितपणे आवाज उठविणे आवश्यक आहे. अहिल्यानगर शहरात लवकरच मातंग समाज मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सत्यशोधक अण्णा भाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष नामदेवराव चांदणे यांनी दिली.


सत्यशोधक अण्णा भाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानतर्फे अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहात सकल मातंग समाजाची बैठक उत्साहात पार पडली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लक्ष्मीकांत भालेराव यांनी भूषविले. बैठकीस काशिनाथ सुलाखे, लक्ष्मण साबळे, शरद मोहिते, दत्तात्रय तुजारे, विष्णू मोहिते, प्रकाश पुजारे, भालेराव, बाबासाहेब शिंदे, अशोक भोसले, पी. बी. पाथरे, दिवसेन घोरपडे, रणजित वैरागर, अरुण ताकवाले आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या अ.ब.क.ड. उपवर्गीकरणाच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजाच्या विविध प्रश्नांवर या बैठकीत सखोल चर्चा व विश्लेषण करण्यात आले, तसेच समाजाच्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकार व मुख्यमंत्री कार्यालयातील सचिव राजेश अग्रवाल यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

भालेराव म्हणाले, मातंग समाजाच्या अ.ब.क.ड. उपवर्गीकरणासाठी शासनाकडे अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. १५ मे २०२६ पासून जनगणना सुरू झाली असून, समाजातील प्रत्येक व्यक्तीने माहिती देताना ‘हिंदू-मांग (मातंग)’ असा स्पष्ट उल्लेख करावा. समाजाच्या अस्तित्वासाठी व हक्कांसाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com