पुण्यातील कसबा पेठेत गोडाऊन फोडून सव्वा पाच लाखांचा माल चोरला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

गोडाऊनचे कुलूप उचकटून चोरट्यांनी गोडाऊनमधील शेतीसाठी आवश्‍यक केबल, वायर असा सव्वा पाच लाख रुपयांचा माल चोरुन नेला. कसबा पेठेमध्ये घडलेली ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. 

पुणे : गोडाऊनचे कुलूप उचकटून चोरट्यांनी गोडाऊनमधील शेतीसाठी आवश्‍यक केबल, वायर असा सव्वा पाच लाख रुपयांचा माल चोरुन नेला. कसबा पेठेमध्ये घडलेली ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिनेशसिंह राजपुरोहित (वय 41, रा. शुक्रवार पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजपुरोहित यांचे कसबा पेठेतील लाकडी बोळ परिसरामध्ये शेतीसाठी लागणारे केबल, वायर अशा वस्तुचे गोडाऊन आहे. 20 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत त्यांचे गोडाऊन बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी गोडाऊनचे कुलूप उचकटून त्यामध्ये पाच लाख रुपयांचा माल चोरुन नेला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: material of ५ lakh stoles at Kasba Peth Pune