आळंदीत माऊली जन्मोत्सव साजरा

आळंदीत माऊली आणि कृष्ण जन्मोत्सव साजरा
mauli
maulisakal
Updated on

आळंदी: सुगंधी मोग-यांची आरास.....समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून त्यावर सोन्यांचे आभूषण आणि गुलाबांच्या पुष्पांचा घातलेला हार.....असे मनमोहक सजविलेले माऊलींचे रूप पाहून उपस्थीत भाविकांनी केलेल्या टाळ मृदंगाच्या गजरात आणि माउलीनामाचा अखंड जयघोषात माऊलींच्या संजिवन समाधीवर आज मध्यरात्री बारा वाजता गुलाबांची पुष्पवृष्टी, पेढे, सुंठवडा वाटून आळंदीतील देवूळवाड्यात माऊली जन्मोत्सव साजरा केला. माउली माउलीचा गजर आणि घंटानादाने परिसर मध्यरात्रीनंतर दुमदुमुन गेला.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गेली दिड वर्षांपासून देऊळ बंद असल्याने माउली जन्म आणि कृष्ण जन्मानिमित्त मोजक्याच वारक-यांच्या उपस्थितीत परंपरेने माऊली जन्माचा कार्यक्रम करण्यात आला. आळंदी देवस्थानच्यावतीने हरिनाम सप्ताहाचे आयोजन परंपरेने केले होते. दरम्यान काल सोमवारी रात्री देऊळ वाड्यात धुपारती झाल्यानंतर नउ ते साडे नउ हरिपाठ झाला.त्यानंतर तयारी सुरू झाली ती माउलीजन्माची.

mauli
राज्य सरकारने रश्मी शुक्ला यांचा अहवाल CBI कडे केला सुपूर्द

माऊली जन्माचा सोहळा समिप आल्याने मोजक्याच आळंदीकर भाविकांना दरवाजातून मंदिरात सोडण्यास सुरूवात केली. दहा ते बारा या वेळेत पंखा मंडपात माझे कुटूंबियांच्यावतीने माऊली जन्माचे किर्तन शरद बंड यांनी केले. त्याचवेळी वीणा मंडपात आळंदीकर ग्रामस्थांचे भजन सुरू होते. दरम्यान समाधी गाभारा मंडपात, साडे अकरा ते बारा च्या दरम्यान प्रमुख विश्वस्त डॉ.अभय टिळक यांच्या हस्ते कृष्ण जन्मानिमित्त गोकूळ पूजन झाले. त्यानंतर वेध लागले ते माउली जन्माचे. पुजारी राजाभाउ चौधरी,नाना चौधरी, शुभम प्रसादे, अमोल गांधी यांनी मुख्य समाधी गाभारा स्वच्छ केला आणि समाधीवर चांदिचा मुखवटा ठेवून अत्तराचा दर्प देत समाधी सजविली.

भरजरी भगवा आणि जांभळा मेखला, आकर्षक फुलांच्या माळांनी तयार केलेला हार, सजविलेल्या माऊलींच्या समाधीवर लक्ष वेधून घेत होता. माऊलींचे हे मनमोहक रूप भाविकांनी नयनात साठविले. जर्बेरा आणि सुगंधी मोग-यांच्या फूलांची सजावट संपूर्ण समाधी मंदिराला केली होती. दरम्यान पंखा मंडपात बंड महाराजांनी ठिक बाराच्या दरम्यान किर्तनात माउली जन्माचे वर्णन करताच भाविकांनी समाधीवर पुष्पवृष्टी करत माउली नामाचा जयघोष केला. त्यानंतर घंटानाद केला आणि पेढे,सुंठवडा वाटण्यात आला.माजी नगरसेवक डी.डी.भोसले,राजाभाऊ नहार यांच्यावतीने फराळ वाटण्यात आला.

दरम्यान देवस्थानच्यावतीने मानक-यांना नारळप्रसाद वाटप केला. यावेळी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. टिळक, अॅड विकास ढगे, पालखी सोहळा मालक ऋषिकेश आरफळकर,राजाभाउ चोपदार,बाळासाहेब चोपदार,व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,श्रीधर सरनाईक,वेद लोंढे यांची उपस्थीती होती. माऊली जन्माच्या सोहळ्यानंतर जागराचा कार्यक्रम सुरू झाला. दरम्यान आज सकाळी वीणा मंडपात बापूसाहेब मोरे यांचे काल्याच्या किर्तनाने हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Unique Tradition: 'Ek Gaon Ek Ganpati' in Ranjangaon and Surrounding Areas
Marathi News Esakal
www.esakal.com