मावळात सुरक्षाविषयक उपाययोजनांचा अभाव

मावळात सुरक्षाविषयक उपाययोजनांचा अभाव
Published on

वडगाव मावळ, ता. २२ : मावळ तालुक्यात एक शासकीय तर दोन अनुदानित अशा तीन आश्रमशाळा असून आंदर मावळात असलेल्या दोन आश्रमशाळांमध्ये काही सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची गरज आहे.
तालुक्यातील आश्रमशाळांमध्ये चहा, नाश्ता, भोजन, शैक्षणिक व आरोग्य विषयक सुविधा पुरेशा प्रमाणात असल्या तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाययोजना मात्र आवश्यक आहेत.
आंदर मावळातील वडेश्वर येथे शासकीय आश्रमशाळा असून येथे विविध गावांतील सुमारे ३५० विद्यार्थी बारावीपर्यंतचे निवासी शिक्षण घेत आहेत. शालेय इमारत नव्याने बांधण्यात आली असून जागेची अडचण लक्षात घेऊन मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाचे काम सुरू आहे. मुलींच्या इमारतीचे काम प्रगतीपथावर असून मुलांच्या इमारतीचे काम बरेचसे बाकी आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षक भिंतीसह या दोन्ही इमारतींची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे. येथे कर्मचाऱ्यांची कमतरता असून त्यात रात्रपाळीसाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

दृष्टिक्षेपात
कामशेत येथे शासकीय अनुदानप्राप्त व महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचलित आश्रमशाळा
या शाळेत सुमारे ४३४ विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे दहावीपर्यंतचे शिक्षण असून त्यात ३३० मुलींचा समावेश
मुलींसाठी तीन तर मुलांसाठी दोन मजली वसतिगृह इमारती
बंक बेड्स, संरक्षक भिंत असून परिसरात स्वच्छता अशा सुरक्षाविषयक पुरेशा उपाययोजना

मुलींवर बेडअभावी जमिनीवर झोपण्याची वेळ
माळेगाव खुर्द येथे शासकीय अनुदानप्राप्त व सेवाधाम ट्रस्ट संचालित आश्रमशाळा असून येथे सुमारे चारशे विद्यार्थी दहावीपर्यंतचे निवासी शिक्षण घेत आहेत. त्यात सुमारे २२५ मुली आहेत. मुले व मुलींसाठी स्वतंत्र निवास खोल्या आहेत. मुलांसाठी बंक बेड्सची व्यवस्था आहे, मात्र जागेअभावी मुलींना अशा बेड्सची व्यवस्था नाही. त्या चार-पाच खोल्यांमध्ये जमिनीवरच अंथरूण टाकून झोपतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने मुलींनाही बंक बेड्सची गरज आहे. आजूबाजूची झाडे-झुडपे लक्षात घेता पक्क्या संरक्षक भिंतीचीही आवश्यकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com