
तळेगाव स्टेशन : उर्से (ता. मावळ) येथे दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या पथकाने आठ दिवसांच्या आत छडा लावला. बुधवारी (ता. ९) आरोपींना जेरबंद करून २५ लाख ३२ हजार रुपये किमतीचे ३५.६ तोळे सोन्याचे दागिने व मोटार जप्त केली. शिरगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-५ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष कसबे, सहायक पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले यांच्या पथकाने समांतर तपास केला.