

Bharat Kesari
esakal
तळेगाव दाभाडे: मावळच्या बैलगाडा शर्यतीच्या मैदानावर आपल्या वेगाने आणि दमदार कामगिरीने पुणे जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘ओम्या’ बैलाचे बुधवारी (दि. २७) निधन झाले. वांगवाडी येथील रामनाथ वारिंगे यांच्या मालकीचा हा बैल बैलगाडा शर्यतप्रेमींमध्ये विशेष लोकप्रिय होता. त्याच्या निधनाने मावळातील बैलगाडा शौकिनांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.