थोपटे महाविद्यालयातर्फे ‘मावळ रानभाज्या महोत्सव’

थोपटे महाविद्यालयातर्फे 
‘मावळ रानभाज्या महोत्सव’
Published on

भोर, ता. २३ : शहरातील श्रीमंत गंगूताई पंतसचिव वाचनालयाच्या सभागृहात गुरुवारी (ता. २७) ‘मावळ रानभाज्या महोत्सवाचे’ आयोजन केले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत होणाऱ्या या महोत्सवात भोरच्या मावळ भागातील बचत गटांमधील महिला विविध प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन, पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या रानभाज्यांच्या पाककृतींचे सादरीकरण तसेच रानभाज्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या विविध खाद्यपदार्थांची माहिती देणार आहेत. येथील राजगड ज्ञानपीठाच्या अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राजगड ज्ञानपीठाच्या सचिव व जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा थोपटे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्‍घाटन होणार आहे.
महोत्सवात विविध रानभाज्यांची ओळख, त्यांचे पौष्टिक व औषधी गुणधर्म, पारंपारिक पाककृती आणि स्थानिक जैवविविधतेचे महत्त्व याबाबतचा शास्त्रोक्त माहिती देण्यात येणार आहे. या महोत्सवातून महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव डोंगरे यांनी सांगितले. महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ.वर्षा कोरे व डॉ.मयुरा दुधाणे या महोत्सवाचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com