महाआवास अभियानाअंतर्गत मावळला सात पुरस्कार

महाआवास अभियानाअंतर्गत 
मावळला सात पुरस्कार
Published on

वडगाव मावळ, ता. १० : महाआवास अभियानाअंतर्गत मावळ तालुक्याला सात पुरस्कार प्राप्त झाले असून, पुण्यात आयोजित ‘मिनी सरस सावित्री जत्रे’मध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
उमेद अभियानांतर्गत पुणे जिल्हास्तरीय ‘मिनी सरस सावित्री जत्रे’चे आयोजन पुण्यात ऍग्रिकल्चर मैदानावर करण्यात आले आहे. या जत्रेचे उद्‍घाटन व पुरस्कार वितरण सोहळा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी नियुक्त सेलेब्रिटी शिवाली परब, यशदाचे उपसंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उमेदच्या प्रकल्प संचालक शालिनी कडु, उप. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, भूषण जोशी, सर्व तालुक्यातील गट विकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आदींच्या उपस्थितीत झाले. यावेळी यशवंत पंचायतराज अभियानाअंतर्गत गुणवंत कर्मचारी व आदर्श ग्रामपंचायत अधिकारी या विभागस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
महाआवास अभियानाअंतर्गत मावळ तालुक्याला सात पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यात महाआवास अभियान ग्रामीण- २ मधील २०२१-२२ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून तृतीय क्रमांकाचे मानांकन तसेच, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून कार्ला ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचे मानांकन, अमृत महाआवास अभियानमधील २०२२-२३ अंतर्गत राज्य पुरस्कृत योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून द्वितीय क्रमांकाचे मानांकन, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून महागावला द्वितीय क्रमांकाचे मानांकन व प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून कार्ला ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. महाआवास अभियानमधील २०२३-२४ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून द्वितीय क्रमांकाचे मानांकन व राज्य पुरस्कृत आवास योजनामध्ये सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून तृतीय क्रमांकाचे मानांकन मावळ तालुक्याला प्राप्त झाले. हे सर्व पुरस्कार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, विस्तार अधिकारी शुभांगी भुमकर, प्रियांका मालपोटे व तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com