
जगभरात १४ फेब्रुवारी हा ‘व्हॅलेंटाइन डे’ (प्रेम दिवस) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट देऊन प्रेम व्यक्त करतात. मावळात मोठ्या प्रमाणावर फुलणारा लाल रंगाचा गुलाब हा ‘व्हॅलेंटाइन्स डे’मध्ये प्रेमाचे रंग भरत असतो. त्यामुळे त्याला जगभरातून मोठी मागणी असते. त्याच अनुषंगाने मावळ तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून गुलाब शेती बहरली आहे. यंदाच्या ‘व्हॅलेंटाइन डे’साठी सुरू असलेली लगबग, हंगामातील आर्थिक उलाढाल, आगामी काळातील संधी या व्यवसायातील अनुभव आदी बाबींचा आढावा घेणारी मालिका आजपासून...