मायणीत पत्रकारांचे जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन

मायणीत पत्रकारांचे जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन
Published on

मायणी पोलिस ठाण्याचा प्रश्न मार्गी लावा

तालुका पत्रकार संघाची मागणी; पोलिस अधीक्षकांना निवेदन

मायणी, ता. ३० : येथील ग्रामपंचायतीने स्वतंत्र पोलिस ठाणे उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जागेचा प्रश्न सुटला असतानाही ठाण्याचे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. हे काम मार्गी लागावे, अशी मागणी मायणी पत्रकार संघाने पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याकडे केली आहे.
येथील पोलिस ठाण्याच्या पाहणीसाठी आलेल्या पोलिस अधीक्षक पिंगळे यांना स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या प्रलंबित मागणीसाठी मायणी पत्रकार संघाच्या वतीने निवेदन दिले. त्यावेळी दहिवडीचे पोलिस उपअधीक्षक रणजित सावंत, पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, मायणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत पाटील, खटाव तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश सुरमुख, उपाध्यक्ष अंकुश चव्हाण, संघटक महेश जाधव, संदीप कुंभार, दत्ता कोळी, विशाल चव्हाण, स्वप्नील कांबळे, अमोल भिसे, मानवाधिकार संघटनेचे डॉ. संतोष डांगे, पोलिस पाटील प्रशांत कोळी, सचिन शेटे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, की मायणी व परिसरातील वाढती लोकसंख्या, गुन्हेगारीचे प्रमाण, मोठे शैक्षणिक संकुल, बाजारपेठ व जिल्हा सीमेलगत असलेले भौगोलिक स्थान लक्षात घेता मायणीत स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करणे अत्यावश्यक आहे. मायणी अतिसंवेदनशील म्हणून पोलिस दप्तरी नोंद असून, याबाबत पत्रकार बांधव वारंवार समस्या मांडत आहे.
यावर पत्रकारांच्या मागणीचा विचार करत आपण वरिष्ठ पातळीवर पोलिस ठाणे निर्मितीसाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी दिली.
------------------------
03424
मायणी : निखिल पिंगळे यांना निवेदन देताना मायणी पत्रकार संघाचे सदस्य. (अंकुश चव्हाण : सकाळ छायाचित्रसेवा)
------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com