मायणीत तिरंगी लढतीचे चित्र

मायणीत तिरंगी लढतीचे चित्र

Published on

मायणी गटातील तिरंगी लढतीकडे सर्वांच्या नजरा

अंकुश चव्हाण : सकाळ वृत्तसेवा

कलेढोण, ता. १ : जिल्ह्याचे लक्ष असलेल्या मायणी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरेंद्र गुदगे, भाजपमधून ॲड. सूरज पाटील, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून ॲड. प्रल्हाद सावंत हे उभे असल्याने ही निवडणूक तिरंगी झाली आहे. दोन वकिलांच्या विरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगेंना टक्कर द्यावी लागत आहे.
निवडणूक जाहीर होताच कलेढोण गणाचे उमेदवार राजू जुगदर व मायणी गणाचे चितळीतील उमेदवार अनिता संभाजी कोळी या राष्ट्रवादी गटाकडून भाजपच्या गोटात दाखल झाल्याने राष्ट्रवादीला अचानक धक्का बसला, तर दुसरीकडे भाजपच्या गोटात दाखल झालेल्या उमेदवारास उमेदवारी दिल्याने मूळ भाजप कार्यकर्त्यांमध्येही काहीकाळ असंतोष निर्माण झाला. मायणी मतदारसंघ इतर मागासवर्गीय पुरुषासाठी राखीव झाल्यामुळे शेखर गोरे समर्थक पांडुरंग झगडे हेही भाजपचे प्रबळ दावेदार होते. मात्र, त्यांनाही वरिष्ठांच्या आदेशाने तलवार म्यान केली. कलेढोण गणात भाजपचा घरोबा असलेले गारुडीचे सचिन चव्हाण यांनी आपली उमेदवारी कायम ठेवत स्वपक्षांविरोधात बंडाचा झेंडा हाती घेतला आहे, तर कलेढोण गणातून पाचवडचे अण्णा घाडगे व वस्ताद कठरेंनी भाजपमधून माघार घेतली. मात्र, वंचितच्या शहानवाझ काझी यांनीही आपला अर्ज कायम ठेवल्याने कलेढोण गणात चौरंगी लढतीचे चित्र निर्माण केले. पूर्वीपासून काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले ॲड. प्रल्हाद सावंत यांना ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उमेदवारी दिल्याने दोन्ही राष्ट्रवादी समोरासमोर लढतानाचे चित्र उभा राहिले. यातच वंचित उमेदवार किती प्रभाव टाकणार? हेही पाहणे रंजक ठरणार आहे. ॲड. सूरज पाटील व ॲड. प्रल्हाद सावंत या दोन वकील उमेदवारांशी टक्कर देताना सुरेंद्र गुदगे विजयाची हॅट्‌ट्रिक मारणार का? हा एक औत्सुक्याचा व चर्चेचा विषय होऊन राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com