Pune News : शहरी गरीब कार्डसाठी 'तलाठी अहवाल' ग्राह्य धरणार; महापौर नागपुरे यांची माहिती

शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे उत्पन्नाचा दाखला मिळण्यात अजूनही येत आहेत अडचणी.
manjusha nagpure

manjusha nagpure

sakal

Updated on

पुणे - शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे उत्पन्नाचा दाखला मिळण्यात अजूनही अडचणी येत आहेत. त्यामुळे शहरी गरीब योजनेचा लाभ नागरिकांना घेता येत नव्हता. त्यावर तोडगा काढत 'तलाठी अहवाला'च्या आधारे नागरिकांना तात्पुरते शहरी गरीब योजनेचे कार्ड काढून द्यावे असे आदेश महापौर मंजूषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com