पुणे : 65 फूट उंचीच्या पांडुरंगाला महापौर, खासदारांनी घातले साकडे; म्हणाले...

पुणे : 65 फूट उंचीच्या पांडुरंगाला महापौर, खासदारांनी घातले साकडे; म्हणाले...

पुणे : कोरोनाच्या आपत्तीमधून माझ्या नागरिकांना 'वाचव रे बाबा...असे साकडे घालत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी साकडे घातले. निमित्त होते ते पुण्यातीलच नव्हे राज्यातील सर्वात भव्य पांडुरंगाची मूर्ती आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांना दर्शनासाठी खुली झाल्याचे. 

पालखी मार्गावर पुण्याहून सासवडकडे जाताना दिवेघाट संपल्यावर ही 65 फूट उंचीची भव्य मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते. त्यावर लावण्यात आलेला सोन्याचा टिळा, हा पंचक्रोशीत चर्चेचा विषय झाला आहे. पांडुरंग भक्त विजय कोल्हापूरे यांच्या संकल्पनेतून मूर्तीची निर्मिती झाली आहे. त्यासाठी त्यांनी सढळ हाताने खर्च केला असून, मूर्तीकार सागर भावसार यांनी हे शिल्प साकारले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापौर मोहोळ, खासदार डॉ. कोल्हे आणि अभिनेते- दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना पुजेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्यांनी मूर्तीची पुजा केली आणि नंतर भाविकांसाठी ती दर्शनाला खुली झाली. या प्रसंगी मुळशी पॅटर्न या चित्रपटाची संपूर्ण टिमही उपस्थित होते. रमेश परदेशी, अभिजीत भोसले, देवेंद्र गायकवाड, गणेश लोणारे, विनोद सातव आदीही या प्रसंगी उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुजेनंतर 'सकाळ"शी बोलताना महापौर म्हणाले, कोरोनाच्या आपत्तीमुळे नागरिक चिंतेत पडले आहेत. प्रशासनही संपूर्ण ताकदीने झगडत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा कोरोनामधून पहिल्यांदाच बसमधून होत आहे. त्यामुळे या संकटातून आम्ही नागरिकांना लवकर वाचव, अशीच प्रार्थना पांडुरंगाकडे केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खासदार डॉ. कोल्हे यांनीही देखील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आम्हाला बळ दे, शक्ती दे अशीच प्रार्थना पांडुरंगाकडे केली आहे. लॉकडाउन असला तरी, 65 फूट उंचीच्या पांड़ुरंगाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आषाढी एकादशीचे निमित्त साधून पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केल्याचे बुधवारी दिसून आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com