पुणेकरांनो, काळजी घ्यावी महापौरांचे आवाहन; कोरोनाचे सावट कायम

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला कोरोना पुढच्या दोन महिन्यांत पसरण्याचा अंदाज आहे. याआधीच्या रोजच्या रुग्णसंख्येत वाढ होऊन ती अडीच हजारांच्या घरात जाऊ शकते, अशी भीती आहे.

पुणे - कोरोनाच्या संकटातही पुणेकरांनी उत्साहात दिवाळीचा उत्सव साजरा केली; सार्वजनिक ठिकाणी कळत-नकळतपणे गर्दीही झाली. मात्र कोरोना अजूनही संपलेला नाही. पुढच्या टप्प्यांत म्हणजे डिसेंबर, जानेवारीत तो वाढण्याची भीती आहे, असे सांगत काळजी घेण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी केले. कोरोनाविरोधात आपण सारेजण आता पुन्हा सामूहिक लढा उभारू, अशी अपेक्षाही मोहोळ यांनी व्यक्त केली. 

या पुढील काळात नव्या रुग्णांना सामावून घेत, त्यांच्यावरील योग्य उपचारासाठी महापालिका आणि खासगी हॉस्पिटलमधील आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. गरजेनुसार तिची व्याप्ती वाढविणार असल्याचेही मोहोळ यांनी स्पष्ट केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला कोरोना पुढच्या दोन महिन्यांत पसरण्याचा अंदाज आहे. याआधीच्या रोजच्या रुग्णसंख्येत वाढ होऊन ती अडीच हजारांच्या घरात जाऊ शकते, अशी भीती आहे. त्यानुसार नागरिकांची तपासणी वाढविण्यापासून पुरेसे बेड उपलब्ध करणे, मृत्यूदर कमी करण्यासाठी उपचार व्यवस्थेत बदल करण्याच्या हालचाली महापालिकेने केली आहे. परंतु, गेल्या काही दिवसांतील कोरोना रुग्णांचे आकडे पाहता सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिक फारशी काळजी घेत नाही. विशेषत-: "सोशल डिस्टन्सिंग' पाळत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे महापालिकेच्या चिंतेत भर पडली आहे. या आनुषंगाने महापौर मोहोळ यांनी पुणेकरांना काळजी घेण्याचे सल्लावजा आवाहन केले आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोहोळ म्हणाले, ""कोरोनाच्या पहिल्या टप्प्यांत पुणेकरांनी सावधानता दाखविली. त्यामुळेच कोरोना आटोक्‍यात येऊ शकला. परंतु, यापुढेही प्रत्येक तेवढीच खबरदारी घेऊन कोरोनाला रोखायचे आहे. सामूहिक प्रयत्नातून ते सहज शक्‍य होणार आहे. सणासुदीचे दिवस संपले आहेत. विनाकारण गर्दी करणे टाळण्यापासून सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. नव्या रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. त्यात डॉक्‍टर, परिचारिका आणि रुग्णवाहिका पुरविण्याला प्राधान्य असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नागरिकांनी काळजी घ्यावी - अग्रवाल 
कोरोना रोखण्याचे उपाय आखले असले तरी, प्रत्येकाने आपापल्या पातळीवर काळजी घ्यावयाची आहे, असे आवाहन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनीही केले आहे. या काळात घरगुती कार्यक्रमांपासून सार्वजनिक कार्यक्रमांत नियमांपेक्षा अधिक गर्दी नसावी. उत्सव साजरा करताना गर्दी होणारे कार्यक्रम टाळावेत, हेही अग्रवाल यांनी म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayor Muralidhar Mohol appealed for caution, saying there is a fear of Corono rising in December, January.