esakal | Video : पुण्यातील शाळा ३ जानेवारीपर्यंत बंदच; महापौरांचा मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

School

१२ डिसेंबरपर्यंत पुणे शहरात ३१७ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

Video : पुण्यातील शाळा ३ जानेवारीपर्यंत बंदच; महापौरांचा मोठा निर्णय

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : कोरोनाच्या दुसच्या लाटेचे पडसाद शहरात उमटू लागल्याचे गेल्या काही दिवसातून समोर आले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे शाळा बंदच ठेवण्यात आल्या आहेत. 

शहरातही कोरोना रुग्ण वाढू लागल्याने महापालिका हद्दीतील शाळा ३ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतला आहे. 

आमदार माधुरी मिसाळ यांच्या बंगल्यात चोरी; 18 लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास​

महापौर म्हणाले, '१४ डिसेंबरपासून पुणे शहरातील सर्व शाळा सुरू करण्यात येणार होत्या. परंतु शाळा सुरू करण्याअगोदर शहरातील खासगी आणि महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेतले जात होते. पालकांच्या संमतीनंतर शाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू होते. मात्र, त्याला मिळालेला अल्प प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेता तसेच कोरोनाची सद्यपरिस्थिती नियंत्रणात असली तरी लहान मुलांच्या दृष्टिकोनातून अजूनही योग्य नाही. त्यामुळे सर्व पार्श्वभूमीचा विचार करून ३ जानेवारीपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे.'

बारावीच्या विद्यार्थ्यांनो, 2021मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेचे भरा फॉर्म; वाचा सविस्तर बातमी​

'४ जानेवारीला त्यावेळची परिस्थिती, पालकांची भूमिका आणि विद्यार्थ्यांचं आरोग्य लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल,' असंही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केलं. 

दरम्यान, १२ डिसेंबरपर्यंत पुणे शहरात ३१७ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील एकून बाधितांचा आकडा १ लाख ७३ हजार ७१९ पर्यंत पोहोचला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी ► क्लिक करा 

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top