मोहोळ माफी मागा; एका ट्विटनंतर पुणेकर महापौरांवर भडकले

mayor murlidhar mohol tweet covid vaccine doses pm modi apology
mayor murlidhar mohol tweet covid vaccine doses pm modi apology

पुणे : देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण पुण्यात. पुण्यात कोरोना रुग्णांना बेड मिळेना. हॉस्पिटल्स, मेडिकल स्टोअर्सच्या बाहेर रांगा. रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये तुटवडा. शहरात इंजेक्शनचा काळाबाजार, अशी सगळी भयंकर परिस्थिती असतानाही पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मीडियावर आभार मानले. मोहोळ यांनी याप्रकाराविषयी माफी मागावी, अशा स्वरूपाची टीका सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या एका ट्विटनंतर मोहळ यांच्या विरोधात सोशल मीडियावर रान उठले आहे. मोहळ यांचे ट्विट परिस्थितीला धरून नाही. मोहोळ खोटो बोलत आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. मोहोळ यांचे मोदींकडे इतकेच वजन असले तर, त्यांना संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी द्यावी, असा सल्लाही ट्विटरवरून देण्यात आलाय. पुणेकरांनी #मोहोळ_माफी_मागा असा हॅशटॅग सुरू केला असून, त्यावर मोहोळ यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय घडले?
देशात सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड कोरोना रुग्णांचे हॉटस्पॉट आहे. त्यातच पुण्याचे महापौर मोहोळ यांनी जिल्ह्याला केंद्राकडून अडीच लाख कोरोना लशीच्या डोसचा पुरवठा केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. केंद्र सरकारकडून पुणे जिल्ह्याला कोरोना लसीचा थेट पुरवठा सुरू झाल्याचे ट्विट मोहोळ यांनी केले होते. मोहोळ शहराचे महापौर असल्यामुळं त्यांच्या ट्विटची दखल मीडियाने घेतली. मात्र, मोहळ यांच्या ट्विटमधील माहिती चुकीची असल्याचे लक्षात आल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे तीव्र पडसाद उमटले. पुण्यात रुग्ण जास्त असल्यानं लशींची गरज जास्त आहे. पण, राज्यात पुण्यासह मुंबई आणि इतर अनेक शहरांमध्ये कोरोनाचा उद्रेक आहे. तिथेही लशींचा तेवढ्याच प्रमाणात पुरवठा का होत नाही, असा प्रश्न महापौर मोहळ यांना विचारण्यात येत आहे.

पुण्याची परिस्थिती सांगा!
पुण्यात भयंकर स्थिती असताना महापौर जर, मोदींचे आभार मानत असतील तर त्यांनी त्याच जबाबदारीने शहरातील परिस्थितीची माहिती पंतप्रधान मोदी यांना द्यावी, असा सल्लाही ट्विटरवर अनेकांनी महापौर मोहोळ यांना दिला आहे. शहरातील परिस्थिती पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्यात मोहोळ कमी पडले, असे अनेकांनी म्हटले आहे. तसेच मोहळ यांच्यावरून यूजर्सनी भाजपवरही टीका केली आहे. भाजपचं अस्तित्वच खोट्यावर टिकून असल्याचं यूजर्सनी म्हटलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com