एमबीबीएस, बीडीएसच्या ९१ जागा रिक्त

एमबीबीएस, बीडीएसच्या ९१ जागा रिक्त
Published on: 

एमबीबीएस, बीडीएसच्या ९१ जागा रिक्त तिसऱ्या यादीत ११,३४० विद्यार्थ्यांना संधी मुंबई, ता. ११ : राज्यातील एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या प्रवेश यादीत ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. दोन्ही अभ्यासक्रमांच्या एकूण ११ हजार ४३१ जागांपैकी ९१ जागा रिक्त राहिल्या आहेत. एमबीबीएसच्या ८,८१४ जागांपैकी ८,८११ जागांवर प्रवेशाची संधी मिळाली असून, तीन जागा रिक्त आहेत. बीडीएसच्या २,६१७ जागांपैकी २,५२९ जागांवर प्रवेशाची संधी मिळाली असून, ८८ जागा रिक्त आहेत. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ही तिसरी यादी जाहीर करण्यात आली. एमबीबीएसच्या ४३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील ५,०६५ जागा आणि २५ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील ३,२९९ जागांवर प्रवेशाची संधी मिळाली आहे. दोन खासगी वैद्यकीय विद्यापीठांतील ४५० जागांपैकी ४४७ जागांवर प्रवेशाची संधी मिळाली असून, तीन जागा रिक्त आहेत. बीडीएस अभ्यासक्रमाच्या पाच शासकीय महाविद्यालयांतील ३१७ जागांवर प्रवेशाची संधी मिळाली आहे. २३ खासगी महाविद्यालयांतील २,२०० पैकी २,१२० जागांवर, तर एका खासगी विद्यापीठातील १०० पैकी ९२ जागांवर प्रवेशाची संधी मिळाली आहे. तिसऱ्या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी १४ ऑक्टोबरला सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मूळ कागदपत्रे आणि आवश्यक शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह संबंधित महाविद्यालयात उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com