Pune Crime Branch arrested an absconding MCOCA accused from Baramati and detained another suspect for providing shelter.
sakal
पुणे : वानवडी पोलिस ठाण्यात दाखल महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने बारामतीतून अटक केली. यासोबतच, त्याला स्वतःच्या घरात आश्रय देणाऱ्या एका साथीदारालाही पोलिसांनी अटक केली आहे.