
वालचंदनगर : पुणे व सोलापूर जिल्हामध्ये दशहत वाढवून सातत्याने योजनाबद्द गुन्हे करणाऱ्या राजेंद्र व राजू महादेव भाळे यांच्या टोळीत १३ सदस्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियमानूसार (मकोका) कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार , उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुर्दशन राठोड व वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी दिली.