
पुणे - कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगार आणि त्याच्या साथीदारांनी हॉटेलमालकासह व्यवस्थापकास मारहाण करून खंडणीची मागणी केली. ही घटना धानोरी जकात नाका परिसरात घडली. या प्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) दाखल गुन्ह्यातील गुन्हेगारासह आठ जणांविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.